नोंदणी: Sangli Miraj/ RSR/CR/2026/1323 नोंदणी: २०२६/१३२३ स्थापना: १८/०९/२०२६ दुधगाव (सांगली)
Vatvruksha Society Dudhgaon Logo

वटवृक्ष क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., दुधगाव

VATVRUKSHA CREDIT CO-OPERATIVE SOCIETY LTD., DUDHGAON
"स्वप्न तुमचे...सहकार्य आमचे.....सर्वांगीण विकासाचे..वचन वटवृक्षाचे.."
ग्राहक सेवा व मदत ९११९९७७७३१
महत्त्वाच्या सूचना सूचना
★ दामदुप्पट ठेव योजना : अवघ्या ८ वर्षे ९ महिन्यांत रक्कम दुप्पट! ★ ८.१५% आकर्षक व्याजदर : १ वर्ष १ दिवस ते २ वर्षे मुदत ठेव व रिकरिंग ठेवींवर ★ ज्येष्ठ नागरिक सन्मान : १ वर्षांवरील ठेवींवर ०.२५% अतिरिक्त व्याज दर ★ सोनेतारण कर्ज : वैद्यकीय व उच्च शिक्षणासाठी अवघ्या ८.७५% दराने तत्काळ मंजूर! ★ दैनिक पिग्मी ठेव : प्रतिनिधींमार्फत दैनंदिन घरपोच संकलन सेवा सुरू आहे.
संस्थेचे वेगळेपण (Key USPs)

ठेवीदारांच्या पैशांची १००% सुरक्षा सुनिश्चित करणारे ५ क्रांतिकारी नियम

सर्वसामान्य ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशाला १००% सुरक्षा व संस्थेच्या नेतृत्वाची संपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करणारे ५ अभूतपूर्व नियम:

01
सक्त कर्ज निर्बंध

१. चेअरमन यांच्यासाठी कर्ज निर्बंध (सक्त मनाई)

संस्थेच्या चेअरमन पदी असणाऱ्या व्यक्तीस/संचालकास संस्थेतून त्यांनी ठेवलेल्या ठेवी वर ठेवीतारण व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे कर्ज घेता येणार नाही.

ठेवीदारांसाठी महत्त्व: संस्था अडचणीत येण्याचे मुख्य कारण म्हणजे चेअरमन व अध्यक्षांनी कोट्यवधी रुपयांची कर्जे स्वतःच्या खाजगी व्यवसायासाठी वापरणे. वटवृक्ष सोसायटीने हा धोका वैधानिक नियमाने कायमचा मुळापासून नष्ट केला आहे.
ठेवीतारण वगळता चेअरमन यांना कोणतेही कर्ज घेता येणार नाही — ठेवीदारांच्या पैशांचा १००% सुरक्षित वापर!
02
निःस्वार्थ समाजसेवा

२. चेअरमन यांना मानधन व भत्त्यांचा संपूर्ण त्याग

संस्थेच्या चेअरमन पदी असणाऱ्या व्यक्तीस संस्थेतून कुठल्याही प्रकारचा भत्ता किंवा आर्थिक लाभ घेता येणार नाही.

ठेवीदारांसाठी महत्त्व: चेअरमन हे पद कमाईचे साधन नसून केवळ समाजाची निःस्वार्थ सेवा करण्याचे पवित्र माध्यम आहे. यामुळे संस्थेचा प्रशासकीय खर्च वाचतो आणि सभासदांना व ठेवीदारांना अधिक चांगला व्याज परतावा मिळतो.
शून्य भत्ता, शून्य मानधन — पद केवळ निःस्वार्थ व निरपेक्ष समाजसेवेसाठी!
03
वैयक्तिक जबाबदारी

३. संचालकांसाठी कर्ज मर्यादा

एका संचालकांसाठी कमाल कर्ज मर्यादा (सोनेतारण कर्ज व्यतिरिक्त) ₹५ लाख. तसेच सर्व संचालकांची मिळून होणारी एकूण कर्जाची रक्कम ही संस्थेच्या एकूण भाग भांडवलाच्या 15% पेक्षा कमी.

ठेवीदारांसाठी महत्त्व: कोणताही संचालक आपल्या पदाचा गैरवापर करून मनमानी कर्ज काढू शकत नाही. दिलेल्या कर्जाच्या वसुलीस संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तिक मालमत्तेसह कायदेशीररीत्या जबाबदार राहते.
कमाल मर्यादा ₹५ लाख | संपूर्ण संचालक मंडळाची वैयक्तिक परतफेड जबाबदारी | संचालक मंडळ व सल्लागार समितीची १००% मान्यता!
04
दुहेरी मान्यता व चेअरमन हमी

४. अपवादात्मक विनातारण कर्जास १००% मान्यता व चेअरमन यांची वैयक्तिक हमी

संचालकांना अपवादात्मक परिस्थितीत जर विनातारण कर्ज मंजूर करायचे असेल तर त्यासाठी संचालक मंडळ आणी सल्लागार समिती यांची १००% मान्यता हवी. तसेच संचालकांना दिलेल्या विनातारण कर्जाच्या वसुलीसाठी संस्थेच्या चेअरमन पदी नियुक्त संचालक हे वैयक्तिक पातळीवर जबाबदार असतील.

ठेवीदारांसाठी महत्त्व: राजकीय अथवा वैयक्तिक हितसंबंधातून विनातारण कर्ज वाटप होणे अशक्य! अपवादात्मक कर्ज मंजूर झाल्यास त्याची वसुली चेअरमन यांना स्वतःच्या वैयक्तिक जबाबदारीवर करावी लागेल.
संचालक मंडळ व सल्लागार समितीची १००% मान्यता आवश्यक | चेअरमन पदी नियुक्त संचालक स्वतः वसुलीसाठी वैयक्तिक पातळीवर जबाबदार!
05
वार्षिक कर्ज आकारणी

५. वार्षिक कर्ज आकारणी

वाहन कर्ज वगळता इतर सर्व प्रकारच्या कर्जांवर दरमहा चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारले जाणार नाही. त्याऐवजी, वर्षातून केवळ एकदाच सरळ व पारदर्शक पद्धतीने वार्षिक व्याज आकारणी केली जाईल. यामुळे कर्जदारांवर दर महिन्याला व्याजाचा अतिरिक्त ताण पडत नाही आणि हिशेब समजणे अत्यंत सोपे होते. शेतकरी, व्यावसायिक व सामान्य खातेदारांना आपली आर्थिक नियोजनबद्धता राखण्यास यामुळे मोठा आधार मिळतो.

ठेवीदार व कर्जदारांसाठी महत्त्व: कर्जदारांवरील मासिक व्याजाचा ताण कमी झाल्याने कर्जाची नियमित व वेळेत परतफेड होते, ज्यामुळे संस्थेची एनपीए (NPA) शून्य राहून ठेवीदारांचे पैसे १००% सुरक्षित राहतात.
दरमहा चक्रवाढ व्याजाचा बोजा नाही • वर्षातून एकदाच सुलभ व सरळ व्याज आकारणी!
ठेवीदारांच्या सुरक्षेची ३-स्तरीय अभेद्य तटबंदी

तुमच्या प्रत्येक रुपयाला ३ मजबूत स्तंभांचे अभेद्य संरक्षण

वटवृक्ष सोसायटीमधील तुमचा प्रत्येक रुपया या ३ मजबूत स्तंभांमुळे १००% सुरक्षित व हमीशीर राहतो

TIER 01

सनदी लेखापाल (CA) व तज्ज्ञ नेतृत्व

हिशोबाची पारदर्शकता, काटेकोर अंतर्गत तपासणी आणि सहकार कायद्यानुसार अचूक आर्थिक नियोजन.

TIER 02

१३ सदस्यीय स्वतंत्र सल्लागार समिती

प्रतिष्ठित कायदेतज्ज्ञ, बँकर्स व विचारवंतांची समिती; ज्यांच्या १००% मान्यतेशिवाय मोठा आर्थिक निर्णय अशक्य.

TIER 03

कायदेशीर वैयक्तिक मालमत्ता दायित्व

संचालक कर्जाच्या वसुलीसाठी केवळ संस्था नाही, तर संपूर्ण संचालक मंडळ व चेअरमन स्वतः वैयक्तिक जबाबदार.

आपल्या कष्टाच्या पैशाला द्या वटवृक्षासारखा मजबूत आधार!

८.१५% पर्यंत आकर्षक मुदत ठेव व्याजदर, ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त लाभ, दामदुप्पट ठेव योजना आणि त्वरित सोनेतारण कर्ज सुविधा.

व्याजदर तक्ता पहा कर्ज ईएमआय कॅल्क्युलेटर आमच्याशी संपर्क साधा